मुख्यमंत्र्यांनी आहे हे टिकवून दाखवावे, तीन चाकी रिक्षा फेल ठरल्याची बावनकुळेंची टीका - ऑपरेशन लोटस
पुणे - झारखंड मधील हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो आरोप हास्यास्पद असल्याची स्पष्टीकरण देत नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यावर वेगवेगळ्या विषयांवर निशाणा साधला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी जर केंद्राचे नेतृत्व केले, तर आम्ही त्याचे स्वागत करतो, पण त्याआधी जे आहे ते त्यांना टिकवता आले पाहिजे, अशी टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती पुरते मर्यादित असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा प्रत्येक ठिकाणी फेल होत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. झारखंड येथील सोरेन सरकार पाडण्यासाठी भाजपा कडून ऑपरेशन लोटस सुरू करण्यात आल्याचा आरोप करत त्यामध्ये मंत्री बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात होता. त्यावरून झारखंड सरकार पाडण्यात माझं नाव हा आरोप खूप हास्यास्पद आहे, माझा त्याच्याशी काही संबध नाहीय, मी कधीच झारखंडला गेलो नाहीय, झारखंडच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याने याबाबत जाहीर केले आहे. त्यामुळे नाना पटोले तोंडघशी पडले आहेत, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.