पुणे : कोरोना रुग्णांना प्रेरणा देणारे बिग बी शशिकांत पेडवाल
पुणे - सध्या समाजमाध्यवर अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतोय. पुण्याचे शशिकांत पेडवाल यांच्याकडे पाहिल्यावर क्षणात अमिताभ बच्चन अर्थातच बिग बी चा भास होता. शशिकांतची ड्रेसिंग स्टाईल, त्याचे केस, त्याची बॉडी लँग्वेज आणि फ्रेंच कट दाढी या सर्व गोष्टी बिग बीशी जुळतात. याचा फायदा घेत त्यांनी कोरोना काळात अनेक कोरोना रुग्णांना अमिताभ बच्चन बनून प्रेरणा दिली आहे. या पुण्याच्या बिग बी शी ईटीव्ही भरतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे.