VIDEO : कंगनाचे तोंड काळे करणाऱ्यांना भीम आर्मी देणार 5 लाख रूपये - atv bharat live
मुंबई - आपल्या वादग्रस्त व्यक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या तोंडाला काळे फासणाऱ्या देशभक्तांना ५ लाख रूपये तर भाजप देशभक्तांना ५ लाख १ रूपयांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. कंगनाविरुध्द भीम आर्मी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहे. देशातील लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि त्यागाने १५० वर्षांनंतर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. आज देशाचा सुवर्ण महोत्सवी देशभरात सुरू आहे. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. देशाच्या स्वातंत्र्याला भीक म्हणून जाहीरपणे संबोधण्याचे धाडस कंगनाने केले आहे. देशात हुकुमशाही असती तर कंगनाचे एवढे धाडस झाले असते का असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला आहे. अजूनही पब्लिसिटीसाठी देशाविरुध्द बोलण्याइतपत स्वातंत्र्य दिलेले नाही. हे कंगनासारख्या नटीला दिले नाही असेही कांबळे म्हणाले.