अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या घरी बाप्पाचे आगमन - गणेशचतुर्थी
मुंबई - यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने करणार असले तरीही भक्तांमध्ये उत्साह कायम आहे. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याच्या घरी नुकतेच गणपती बाप्पाचे आगमन झाले. गेली 71 वर्ष बाप्पाचे आगमन त्यांच्या घरी होते. यंदाही वाजतगाजत गणपतीचे स्वागत केले आहे. नुकतेच त्याच्या सोशल मिडीयावरून त्याने ही व्हीडीयो शेयर केला.