पुरुष की महिला.. 'छिंदर पाल कौर', पुरुषाचे कपडे घालून महिला चालवते रिक्षा - video story
भटिंडा -एकविसाव्या शतकात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहेत. ही गोष्ट भटिंडाला राहणाऱ्या छिंदर पाल कौर यांनी खरे करून दाखवले आहे. साधारणपणे महिला रिक्शा चालवत नाहीत. मात्र, ती दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी त्या रिक्शा चालवत आहे. स्त्रियांविरुध्द वाढत जाणारे अत्याचार पाहून त्या पुरूषांचे कपडे घालणे पसंत करतात. गरिबी असूनही भटिंडाला राहणारी छिंदर कौर पाल ही धैर्याने सामना करत जीवन जगत आहे. ईटीव्ही भारतकडून या स्त्रीचा साहसाला सलाम....
Last Updated : Jun 25, 2021, 1:46 PM IST