मंत्रालयाच्या गेटवर एका व्यक्तीकडून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न - एका व्यक्तीने घेतले विष
मुंबई - मंत्रालयाच्या गेटवर एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळावरील उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विष पिऊन आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वी 15 ऑगस्टला देखील मंत्रालयाच्या गेटवर जळगावच्या एका व्यक्तीने आत्मदहन कऱण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या व्यक्तीला आत्मदहन करण्यापासून रोखल होते.