महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : कोविड प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण; कळंब तालुक्यातील घटना - आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन यवतमाळ

By

Published : Jan 14, 2022, 7:30 PM IST

यवतमाळ : कोविडच्या ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण (Asha Worker beaten) करण्यात आली. ही धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली. विना ससाणे असे जखमी आशा वर्करचे नाव आहे. नांझा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी येथील एका व्यक्तीने घरी येऊन माझ्या बायकोच्या लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तात्काळ द्या. तुम्ही गावात सर्वांना कोरोनाची माहिती देता, लसीकरण करता, मग प्रमाणपत्र का देत नाही असे म्हणून दारू पिऊन असलेल्या या इसमाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनतर ती नांझा प्रथमिक आरोग्य केंद्रात जात असताना पुन्हा चौकात तिला अडवून शिवीगाळ करून मारहाण केली. यात तिच्या हाताला जबर दुखापत झाल्याने फॅक्चर झाला. या संदर्भात कळंब पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गंभीर दखल घ्यावी यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने मुख्याधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details