तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? - संजय राऊत - शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई : जे मूळ भाजपमधील नाही, ज्यांना भाजपची विचारधारा माहिती नाही असे बाहेरून आलेले काही फुटकळ लोक धमक्या देत आहेत. रोज उठतात आणि बोलतात, याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. तुरूंग तुमच्या बापाचं आहे का? असा थेट सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. पंतप्रधान मोदींनी अनेक सार्वजनिक आस्थापनांचे खासगीकरण केले आहे. त्याचप्रमाणे तुरूंगांचही खासगीकरण करून त्याच्या चाव्या या लोकांच्या हाती दिल्या आहेत का? तुम्ही कायद्याचे पण मालक झाला आहात का? आज याचा नंबर, उद्या त्याचा नंबर असे बोलतात. तुमचाही नंबर येईल तेव्हा तुमच्यासाठी रडणारं कुणी नसेल असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.