हर्णेत अतिवृष्टी; रस्ते झाले जलमय - Heavy rains in Ratnagiri district
रत्नागिरी - दापोलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक गावे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. हर्णैत झालेल्या ढगफुटीने गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. तसेच नाथनगर येथील अनेक घरांमध्ये पावसाच्या पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली. हर्णै परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाचे पाणी सर्व नाथद्वारनगर, मेमन कॉलनी आणि हर्णै परिसरामध्ये घुसून हर्णै येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही पावसाचा जोर कायम रहिल्यास पुन्हा जनजीवन विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.