खासगीमध्ये १ हजार रुपयांना कोरोना लस - अजित पवार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल बातमी
पुणे - आज सकाळी सीरम इन्स्टिट्यूटच्या डॉ. जाधव यांच्याशी कोरोना लसी संदर्भात चर्चा झाली. खासगी केंद्राला ६०० रुपये दराने लस देण्यात येत आहे. उत्पादित लसीपैकी ५० टक्के लसी केंद्र सरकारला तर ५० टक्के लस इतर राज्य व खासगी केंद्रांना देण्यात येत आहे. मुंबई आणि पुणे येथे खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. ते १ हजार रुपयांना लस देत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यामांशी बोलताना दिली. पवार पुढे म्हणाले, १८ ते ४४ साठी राज्य सरकारने कोविशील्ड लसीसाठी ३०० रुपये प्रतिडोस तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनसाठी ४०० रुपये प्रतिडोस दर ठरवण्यात आले होते. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. पवार साहेबांनी डॉ. जाधव यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे जाधव यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्राने परदेशातील लसींना देखील परवानगी दिली आहे.