छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने दर्यापूर शहरात मोर्चा, शेकडो शिवप्रेमींचा सहभाग - दर्यापूर शिवसेना आंदोलन
अमरावती - छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी बसविलेला पुतळा ( removal of statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) पहाटे काढण्यात आल्यानंतर तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट ( Shivsena leader Goal Arbat ) यांच्या नेतृत्वात शेकडो शिवप्रेमींनी दर्यापूर नगरपालिकेवर ( Morcha at Daryapaur Municipality ) मोर्चा काढला. मोर्चात शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रशासन व स्थानिक लोक्रतिनिधींनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याला जोपर्यंत परवानगी देत नाही, तोपर्यंत हटणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे बराच वेळपर्यंत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता.