VIDEO : शिर्डी - राहाता रोडवर बेभान दुचाकी स्वाराने दुसऱ्या दुचाकीला दिली धडक - दुचाकी अपघात शिर्डी राहाता रोड
अहमदनगर - अत्यंत वर्दळीच्या असलेल्या अहमदनगर - मनमाड महामार्गावरील राहाता - शिर्डी रोडवर ( bike accident Shirdi Rahata road ) एक मद्यधुंद अवस्थेत दुचाकीस्वार आपली दुचाकी बेभान चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात हा दुचाकीस्वार चक्क रस्त्याच्या अगदी बाजूने जाणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकी स्वारावर जाऊन आदळला. आणि तो दुचाकीस्वार काही क्षणात खाली कोसळला. ही घटना मागे असणाऱ्या कोणी अज्ञात व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. मात्र, यावरून अशा महाभागामुळे निरपराध व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.