VIDEO : वीज वहिनीच्या शॉर्टसर्किटने 300 क्वींटल सोयाबीन जळून खाक
यवतमाळ - शेतातून गेलेल्या वीज वहिनीच्या शॉर्ट सर्किट होऊन 300 क्वींटल सोयाबीन गंजीला आग लागली. यात शेतकऱ्याचे जवळपास पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडले आहे. त्यात शॉर्ट सर्किटची भर पडली आहे. आत्माराम चव्हाण यांनी 25 एकर शेती मकत्याने केली होती. सोयाबीन निघाल्यावर शेतात गंजी लावून ठेवली होती. दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून सोयाबीन खाक झाले. यापूर्वी चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीकडे अपघात होण्याची भीती व्यक्त केली होती. परंतु अधिकारी वर्गाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्याने कनिष्ठ अभियंता यांच्याकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.