ओडिशातील हरहुन्नरी कलाकार - art
मयुरभंज - सामाजिक संदेश देण्यासाठी तो कागद आणि झाडांवर नामवंत व्यक्तींची चित्रे रेखाटतो. त्याची लेखणी विचारांना आकार देते. काही तरी वेगळं करण्याची उर्मी बाळगतो.ओडिशातील या युवा कलाकाराने राज्यातील सन्मानित साहित्यिक मनोज दास, मूर्तीकार दिवंगत रघुनाथ महापात्र यांच्यासह विविध प्रमुख व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. या माध्यमातून त्यांनी या व्यक्तींच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली दिली आहे.मयूरभंज जिल्ह्यातील अगडा गावातील रहिवासी असलेला समरेंद्र बेहरा झाडांवर करत असलेलं कोरीव काम आणि त्याच्या कलेच्या जोरावर परिसरात सध्या चर्चेत आहे. तो जिद्दीने समरसून कलाकृती तयार असल्याने त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. बेहरा झाडांवर प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे रेखाटतो. त्याची ही कला, पाहणाऱ्यांना अधिकच आकर्षीत करते आणि पाहणारे त्याचं तोंडभरून कौतुक करतात.
Last Updated : Jul 9, 2021, 8:54 AM IST