माटुंग्यात भाजी विक्रेत्याला मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल, तिघांना अटक - भाजी विक्रेत्याला तरुणास मारहाण
मुंबई - शहरातील माटुंगा येथील एका भाजी विक्रेत्याला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उदयकुमार नाडर, बालकृष्ण नाडर आणि रमेश अशी त्या भाजी विक्रेत्या मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मारहाण झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. मारहाणीचे हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सीसीव्हीत कैद झालेल्या दृश्यात स्पष्ट दिसत आहे, की आरोपी पीडित भाजी विक्रेत्याच्या दुकानात येतात. त्यानंतर त्याच्याशी काही वेळ बोलतात, बोलत असताना एक आरोपी दुकानात प्रवेश करतात. त्यानंतर या व्हिडिओतील घटनेची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ माटुंगा परिसरातील भाजी विक्रेत्याला झालेल्या मारहाणीचा आहे. या मारहाणीचे मूळ कारण म्हणजे उदय नाडरने स्वत: हे भाजीचे दुकान आधी भाड्याने घेतले होते आणि तो पीडित मुलगा त्याच्याकडे काम करायचा. मात्र लॉक डाऊनमध्ये हे चालत नव्हते. त्यानंतर पीडित मुलाने स्वतः ते दुकान मालकाशी बोलून चालवायला घेतले. यामुळे उदय नाडर त्याच्यावर संतापला होता. त्यातूनच नाडरे या मुलास मारहान केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Last Updated : Aug 23, 2021, 1:57 PM IST