महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अमरावतीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला बेड्या - 15 year old girl tortured

By

Published : Jul 7, 2021, 3:59 PM IST

अमरावती - अमरावतीमधील दर्यापुरातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय मुलगी रात्री ८ वाजेदरम्यान घराबाहेर निघाली असता नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून घरामागील जागेत नेत तिच्यावर अत्याचार केला. रात्री बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या आईने शोध घेतला. मुलीने आईला संपूर्ण आपबिती सांगितली. मुलीच्या आईने तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी हरी उर्फ दिवाकर कराळे विरुद्ध पोस्कोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास खोलापूर पोलीस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details