महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : घरकाम करणाऱ्या 111 महिलांनी अनुभवली हवाई सफर - ETV BHARAT LIVE

By

Published : Oct 19, 2021, 5:27 PM IST

पुणे - नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित ऑनलाइन उखाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या १११ घरकामगार महिलांना मनसेने मोफत हेलिकॉप्टरची सफर घडवली आहे. पुणे शहरातील जनता वसाहत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी योगेश आढाव आणि निर्मल फाउंडेशन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. मनसेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त ऑनलाईन उखाणा स्पर्धेत उल्लेखनीय ठरलेल्या १११ महिलांना हेलिकॉप्टरमधून हवाई सफर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. नवरात्रोत्सवात ऑनलाईन उखाणा स्पर्धा पार पडली. आणि त्यात सहभागी झालेल्या १११ महिलांनी मंगळवारी हेलिकॉप्टर सफर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details