Nagpur Ward Reconstruction : महानगर पालिकेच्या प्रभाग निर्मितवर नागरिकांचा आक्षेप, 132 आक्षेपांवर सुनावणी - नागपूर महापालिका प्रभाग रचना
नागपूर - नागपूर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रत्येकी तीन नगरसेवकांच्या प्रभाग रचनेची (Ward reconstruction) नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याच प्रभाग रचनेच्या आक्षेपांवर आज सुनावणी घेण्यात आली. यात नव्याने तयार झालेल्या प्रभाग रचनेवर 132 आजी माजी आणि इच्छुक नगरसेवकांनी आणि उमेदवारानी आपले आक्षेप नोंदवले. नागपूर शहरात 52 प्रभाग करण्यात आले आहे. याची सुनावणी निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या निवडणूक निरीक्षण वेणूगोपाल रेड्डी यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. अनेक लोकांनी प्रभागातील भौगोलीक परिस्थिती, तर कुठे लोकसंख्या, कुठे आरक्षण तर कुठे हद्दीबद्दल आक्षेप नोंदवले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST