Uddhav Thackeray Warns BJP : ..चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या'.. कुटुंबियांच्या बदनामीवर उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा - Uddhav Thackeray warns BJP
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत ( Central Investigation Agency ) कुटुंबियांवर होत असलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक झाले ( Uddhav Thackeray On ED Action ) आहेत. विधानसभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर चौफेर टोलेबाजी करत, इशारा ( CM Thackeray Criticized Opposition ) दिला. आमच्या कुटुंबियांवर गलिच्छ असे आरोप लावायचे. त्यावरून राजकारण करायचे, हा चुकीचा प्रकार आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही उगीचच माझ्या कुटुंबियांना त्रास देत आहात. आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांच्या भानगडी काढल्या आहेत? याच्यावरती टाच, त्याच्यावरती टाच. तुम्ही उगीचच जर टाच मारून आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात ठेवा, आम्हाला शाळेत असताना एक कविता होती. खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST