Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार सर्वांनी आत्मसात करावेत : छत्रपती संभाजीराजे - किल्ले शिवनेरी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) आचार, विचार सर्वांनी आत्मसात करावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhajiraje ) यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ( Shiv Jayanti 2022 ) आज संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मोठ्या संख्येने शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर गर्दी केली आहे. यावेळी किल्ले शिवनेरीवर छत्रपती संभाजीराजे यांनी देखील हजेरी लावली असून, आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी बातचीत केलीय. काय म्हणालेत संभाजीराजे पाहुयात..
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST