Mahashivaratri Special : महाशिवरात्रीनिमित्त पैठणी साडीवर साकरले महादेव, पाहा VIDEO - येवला पैठणी साडीवर महादेव
येवला ( नाशिक) - महाशिवरात्रीनिमित्त येवल्यातील पैठणी विणकाम कारागीर चेतन धसे याने पैठणी साडीवर महादेवाचे चित्र साकारल्या असून या कारागिराला महादेवाचा चेहरा पैठणी साडीवर काढण्याकरता 20 दिवसांचा कालावधी लागला आहे. येवल्यातील पैठणी जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपली कला विविध पद्धतीने पैठणी साडीवर साकारत असतात. अशाच चेतन धसे विणकरांने महाशिवरात्रीचे औचित्य साधत पैठणी साडीच्या पदरावर महादेवाचा चेहरा आपल्या हाताच्या साह्याने विणकाम करून साकरला असून यापुढे हा कारागीर विविध कला पैठणी साडीवर काढणार असल्याची माहिती या विणकरांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST