महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jalna BJP Protest : जालना- नांदेड महामार्गावर चक्काजाम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी भाजप आक्रमक - आमदार बबनराव लोणीकर

By

Published : Feb 17, 2022, 5:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

जालना : जालना जिल्ह्यातल्या सेवली गावातील शिवरायांचा पुतळा हटवल्यानं ( Shivaji Maharaj Statue Removed ) भाजप आक्रमक झालीये. भाजप आमदार बबनराव लोणीकर ( MLA Babanrao Lonikar ) यांच्या नेतृत्वात जालना ते नांदेड महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात ( BJP Protest On Jalna Nanded Highway ) आलं. सेवलीत काही नागरिकांनी शिवरायांचा पुतळा बसवला होता. मात्र या पुतळ्याला परवानगी नसल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं तो हटवण्यात आला होता. त्यामुळं मंठा परतूर मतदार संघात तणावातचं वातावरण निर्माण झालं होत. आज भाजपनं जालना ते नांदेड महामार्गावर वाटूर फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केलं असून, आमदार लोणीकर यांनी संबळ वाजवून सरकारचा निषेध केलाय.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details