Celebrate Holi : गुटखा, दारू अन् तंबाखूचे दफन करत जळगावात होळी साजरी - जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्र
जळगाव - व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते संसार उघड्यावर पडतो. यामुळे जळगावात जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे व्यसनांना दफन करत श्रद्धांजली वाहत अनोखी होळी साजरी करण्यात आली. राज्यात सर्वत्र होळी सण साजरा केला जात आहे. मात्र, जळगावात अनोख्या पध्दतीने जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्रातर्फे हा सण साजरा करण्यात येवून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला. जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्र व जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गुटखा, तंबाखू आदींच्या पुड्या एकत्र करत त्यावर माती टाकण्यात आली, अशी अनोखी होळी साजरी करण्यात आली. व्यसन टाळा आणि आनंदी, जीवन जगा, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST