'रजतनगरी'च्या चांदीच्या बाजारपेठेला उतरती कळा; १०० कोटींची उलाढाल राहिली केवळ ५० टक्के! - Marathi Business News
मंदीचे सावट देशाप्रमाणेच जिल्ह्यातील बुलडाणा 'रजतनगरी' म्हणून ओळख असलेल्या खामगाव येथे स्पष्ट दिसत आहे. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने चांदीची १०० कोटींची उलाढाल केवळ ५० टक्के झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर व्यापाऱ्यांसह चांदीच्या कारागिरांवर संक्रांत येण्याची भीती व्यक्त होवू लागली आहे.