ज्वेलरी उद्योगाला मंदीची मोठी झळ, हजारो कुशल कारागिरांचे रोजगार संकटात - एआयजीजेडीसी
कोलकाता - वाहन, स्थावर मालमत्तेसह दागिने उद्योगही (ज्वेलरी) मंदीमधून जात आहे. हजारो कुशल कारागिर नोकऱ्या गमावतील, अशी भीती अखिल भारतीय रत्न आणि दागिने परिषदेने (एआयजीजेडीसी) व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात आणि जीएसटीत कपात करावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.