Explainer जाणून घ्या, वाहनांची नवीन भारत सिरीज नोंदणी, असा मिळणार फायदा - Bharat series
नवी दिल्ली - वाहनांचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी वाहन मालकांना भारत सिरीज किंवा बीएच सिरीजमध्ये वाहनांची नोंदणी करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने आज काढले आहे. जाणून घ्या, भारत सिरीजविषयीची सविस्तर माहिती.