प्रेरणादायी! नोकरीच्या मागे न लागता पडीक जमिनीवर फुलवला लघु उद्योगाचा 'बहर' - आकाश चिरडे
यवतमाळ - पडीक जमीन म्हटले तर शेतीचे कोणतेही पीक घेणे जवळपास शक्य असते. मात्र, ' इच्छा तेथे मार्ग ' या उक्तीचा प्रत्यय आणत दारव्हा येथील तरुणाने पडीक जमिनीवर लघु उद्योग प्रकल्प साकारला आहे. आकाश चिरडे असे सुशिक्षित बेरोजगारांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतातील पडीक जमिनीवर फ्लाय अॅश वीट उद्योगाची उभारणी केली आहे.