लग्नसराईने सोन्याचा वाढला 'भाव'; आजपर्यंतचा विक्रमी उच्चांक - सोने भाव वाढ
जळगाव - लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने सोन्याच्या भावाने आजपर्यंतचा नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे भाव शुक्रवारी प्रथमच ४२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. तर चांदीही ४८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारातील अस्थिरता व डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया या कारणांनी सोन्याचे भाव वाढत आहेत.