Speeding Truck Burn in Nagpur : विदर्भात उष्णतेची लाट; धावत्या ट्रकने वर्दळीच्या चौकात घेतला पेट - Heat wave in Vidarbha
नागपूर - सध्या नागपुरात सूर्य चांगलाच ( Heat wave in Vidarbha ) तळपला आहे, तापमानाचा पारा 40 अंशाच्या जवळ गेला आहे. अश्यात आग लागण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत. आज (बुधवार) दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास एक ट्रक सीताबर्डीकडून वर्धा मार्गाने जात होता. यावेळी अचानक ट्रकच्या कॅबिनमध्ये आग ( speeding truck burn in nagpur ) लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने तात्काळ ट्रकच्या बाहेर उडी मारली. या घटनेत ट्रक जळून खाक झाला असून सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच एक बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विजवली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST