शरद पवारांनी कॉंग्रेस पक्ष सोडला नव्हता, तर त्यांची हकालपट्टी झाली होती - रामदास आठवले - अनंत गीते वक्तव्य प्रकरण
मुंबई - शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी शरद पवारांनी पक्ष सोडला नव्हता. उलट कॉंग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपसोबत यावे आणि अडीच वर्षांच्या सूत्राचा विचार करावा, असेही आठवले म्हणाले.