महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

खासदार भावना गवळी यांना 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी पाठवले समन्स - सईद खान यांना अटक

By

Published : Oct 18, 2021, 3:48 PM IST

वाशिम - शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. 20 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत हे समन्स आहे. यापूर्वी 29 सप्टेंबरला त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना 4 ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. आता पंधरा दिवसांनी त्यांना दुसरे समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने मागील महिन्यात खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details