नरेश म्हस्के.. शाखेचा बोर्ड लिहण्यापासून ते ठाण्याच्या महापौर पदापर्यंतचा प्रवास - mayor naresh mhaske
शाखेचा फलक लिहीण्यापासून राजकारणाला सुरुवात केली तेव्हापासून सेनेचा जिल्हाप्रमुख आणि आज ठाण्याचा महापौर हा प्रवास माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. शहराच्या विकासावर भर देताना नगरसेवकांच्या अधिकारावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. याची काळजी घेतली जाईल. असे मत ठाण्याचे नवनिर्वाचीत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.