सीमा विवाद : भारत-चीन सैन्यात आज चर्चेची बारावी फेरी - India-China talks
भारत आणि चीन यांच्यात आज शनिवारी लष्करी पातळीवरील चर्चेची बारावी फेरी सुरू झाली आहे. सकाळी साडेदहा वाजता चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्डो या ठिकाणी चर्चेला सुरुवात झाली. गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत.