दिवाळीच्या निमित्ताने फुल बाजारात संचारला उत्साह; शेतकऱ्यांसह व्यापारी वर्ग खुश - Flower Mandi Rates in Nagpur
अनेक दशकांपासून नागपुरच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी परिसरातील फुल बाजारात आज दिवाळी निमित्ताने ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र बघायला मिळाले. कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या दिवाळीत फुलांची विक्री होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे निराश झालेले फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत आहे. बाजारात फुलांची चांगली आवक झाली असून भाव देखील चांगला मिळत असल्याने ऐतिहासिक फुल बाजारात नवं चैतन्य संचारल्याचे चित्र आहे.