सत्य घटनांपासून प्रेरित 'मुंबई डायरीज 26/11' - konkona sen sharma
मुंबई - मुंबई डायरीज 26/11 काल्पनिक कथा आहे. रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी तसेच अविस्मरणीय आणीबाणीच्या प्रसंगाला आणि आव्हानांना उलगडून दाखवतात हे यात दाखवण्यात आले आहे. यात मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे डॉक्टरांची भूमिका करत आहे. ईटीव्ही भारतची प्रतिनिधींनी मृण्मयीची खास मुलाखत घेतली. यात तिने विविध मुद्दयांवर आपली मते व्यक्त केली. यात तिच्या मते रियल लाईफची व्याख्याही तिने सांगितली.