'बेंबीच्या देठापासून ओरडण्यापेक्षा केंद्राकडून निधी आणावा'
सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळात कोकणातील झालेले नुकसान पाहता येथील लोकांच्या दुःखाचे निराकरण करता यावे म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे पंतप्रधान नुकसानीची पाहणी करताना विमानातून जमिनीवरही उतरले नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः लोकांशी संवाद साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी बेंबीच्या देठापासून राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापनाचे पैसे केंद्राकडून आणले तर त्यांना शाबासी देऊ, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांना लगावला.