Bus Over Z Bridge : झेड ब्रिजवरून धावली बस! - वाहतूक बदलली
पुण्यातील वाहतूक कोंडी (Traffic congestion in Pune) नित्याचीच आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक काही प्रमाणात बदलली (Traffic changed) आहे. लकडी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे खोळंबा, वाहतूक कोंडी झाल्याने पीएमपीएलच्या बस ड्रायव्हरने प्रवाशांचा जीव धोक्यात घालून झेड ब्रीजवर बस नेली. बसचे चाक डिव्हायडरवर आदळले, तरी चालकाने बस तशीच पुढे दामटवली. घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. बंद असलेले संभाजी पुलावरील मेट्रोच काम सुरू झाले आहे. या कामामुळे लकडी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
Last Updated : Dec 25, 2021, 2:59 PM IST