'माती'चा वापर करुन गंभीर आजार बरे करणारा देवदूत 'गुरु चरण जेना' - गुरु चरण जेना न्यूज
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील एक पारंपरिक आयुर्वेदिक डॉक्टर 'गुरु चरण जेना'. उपचारांसाठी पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांचा वापर करतात. माती, पानी, हवा, सूर्य किरण यांचा वापर करून ते रुग्णांना बरं करतात. याच नैसर्गिक संसाधनाचा वापर करुन त्यांनी कॅन्सर, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह, पक्षघातासारख्या आजारातून रुग्णांना बाहेर काढले आहे. ओडिशाचे माजी राज्यपाल गोपाल रामानुजन यांनाही याच उपचारपद्धतीचा वापर करत आजारातून बाहेर काढण्यात आले होते.