दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती; चिमुकल्यांने जोडले अमोल कोल्हेंना दोन्ही हात, पाहा Video - boy greeted MP Amol Kolhe in kolhapur
कोल्हापूर - स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत. त्यानंतर राजा शिवछत्रपती मालिकेत सुद्धा त्यांनी शिवरायांची अप्रतिम भूमिका त्यांनी साकारली आहे. या दोन्ही मालिकांनंतर लोकांच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळंच स्थान निर्माण झालं आहे. याचीच प्रचिती स्वतः कोल्हे यांना कोल्हापुरात आली. येथील छत्रपती ताराराणी चौकामध्ये आपल्या वाहनातून जात असताना बाजूने जात असलेल्या गाडीवरील एका चिमुकल्याने त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार ( boy greeted MP Amol Kolhe ) केला. 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' या अंभगाची आपल्याला प्रचिती येते. हा क्षण कॅमेरात कैद झाला असून त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय लहानग्यांचे हे निर्व्याज प्रेम वेगळीच उर्जा देते आणि जबाबदारीची जाणीव करून देते असे कॅप्शन सुद्धा दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST
TAGGED:
boy greeted MP Amol Kolhe