VIDEO : पुण्यात व्हॅलेंटाईन डे निमित्त अनोख्या पद्धतीने पुस्तकाचे प्रमोशन - तुझ्यात मी आणि माझ्यात तू
पुणे - आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2022) निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन रोड येथे एका अवलिया कवीने आपल्या पुस्तकाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन केले. सत्यराज यादव या कवीने विदूषकाच्या रुपामध्ये लोकांचं मनोरंजन करून आपल्या 'तुझ्यात मी आणि माझ्यात तू' या पुस्तकाचे प्रमोशन केले . यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेस प्रेम देखील हे एखाद्या विदूषकाचा चेहऱ्यासारख असते. ते व्यक्त होतं किंवा ते व्यक्त होण्याचे प्रकारही विविध असतात, असेही ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST