Ram Kadam Reaction Nawab Malik ED Inquiry : ईडीची कारवाई व्यक्तीच्या विरोधात नाही, कुप्रवृत्तीच्या विरोधात - राम कदम - ईडीची कारवाई व्यक्तीच्या विरोधात नाही
मुंबई - राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या पथकाने आज (बुधवारी) सकाळी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्या साथीदाराची जमीन कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. देशद्रोहाच्या साथीदाराकडून जमीन विकत घ्यायची आणि चौकशी केली तर कांगावा करायचा हे योग्य नाही. महाराष्ट्रातील जनता हे सर्व जाणून आहे. ईडीची कारवाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्या व्यक्तीने जर एखादी वाईट कृत्य केले असेल भ्रष्टाचार केला असेल तर त्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार राम कदम यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडीने चुकीची कारवाई केल्याचा कांगावा करू नये, असेही राम कदम यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST