MH Assembly Budget Session 2022 : महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे पेक्षा जाडे - गिरीश महाजन - Girish Mahajan Critisized MVA Government
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विशेष म्हणजे मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातल्या प्रकरणावर भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. मागच्याच महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे निलंबन मागे घेण्यात आले. भाजपच्या बारा निलंबित आमदारांमध्ये समाविष्ट असलेले भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सहकाऱ्यांबरोबर विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार हे गेंड्याच्या कातडीपेक्षा जाडे असल्याची प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST