VIDEO : अयोध्येला जाणाऱ्या पालखीचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत - palhki Ayodhya welcome Devendra Fadnavis
नागपूर - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर ते वाराणसी होत अयोध्येला जाणाऱ्या संकल्पपूर्ती रथ घेऊन आलेल्या वारकऱ्यांच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखीतील वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर करत भजण कीर्तन केले. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाल्याच्या निमित्ताने संकल्पपूर्ती रथ यात्रा सुरू केली आहे. ही रथयात्रा पंढरपूर ते वाराणसी आणि आयोध्येपर्यंत जाणार असून, रथयात्रा नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ पोहोचली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढे रवाना केल्याचे विष्णू महाराज सुरवसे यांनी सांगितले. पण यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यास नकार दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST