गोवा विधानसभा निवडणूक २०२२ : गोव्यात भाजपा स्थिर सरकार देईल - प्रमोद सावंत - गोवा विधानसभा मतदान
पणजी (गोवा) - गोवा विधानसभा निवडणूक २०२२ ( Goa Assembly Election 2022 ) साठी मतदान सुरू आहे. गोव्यात भाजपा 22 जागांच्या पार जाईल त्यावेळी सरकार स्थापन करताना आम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे. गोव्यात मनोहर परिकर यांच्या नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपा विरोधात काँग्रेसने रान पेटवले आहे. तर आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनीदेखील या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा गोव्यात पार पडल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात स्थिर सरकार बरोबरच गोव्याच्या विकासाची नव्याने हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होत आहेत. ते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना गोव्यात भाजपाला बहुमत मिळवून भाजपा स्थिर सरकार देईल असा विश्वास वाटतो आहे. 2022 मध्ये आम्ही 22 पेक्षा जास्त शीट मिळू असे यापूर्वी मी सांगितले आहे हे खरे होईल. गोव्याच्या विकासाचा मी चालना दिलेली आहे. मनोहर परिकर यांच्यानंतर जरी या निवडणुका होत असल्या तरी गोव्यातील जनतेचा भाजपावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीचे दहा तारखेला येणारे कौल आपण पाहिल्या नंतर तुमच्या लक्षात येईल की भाजपाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. गेले सहा महिने हे मिशन मी लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे असेही ते यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST