VIDEO: बारा गाड्या ओढण्याची यात्रा उत्साहात झाली, सातपूरला भाविकांची माेठी गर्दी - बारा गाड्या कार्यक्रम सातपूर
नाशिक - भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सातपूरला १३० वर्षांहून अधिक काळ अखंडीतपणे गुढीपाडव्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा उत्सव खंडीत झाला होता. आता कोरानाचे निर्बंध हटवण्यात आल्याने गुढीपाडव्याला पुन्हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी सातपूर येथील बारागाड्या जत्रोत्सव पार पडला. या सोहळ्यास पालकमंत्री छगन भुजबळ, शिवरायांचे वंशज युवराज शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत हा पारंपरिक सोहळा पार पडला. बारा गाड्या जत्रोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण घाटोळ यांना मान देण्यात आला. तर, उपाध्यक्षपदी त्र्यंबक भंदूरे आणि कार्याध्यक्षपदी सागर निगळ यांची निवड करण्यात आली हाेती. यावर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान किरण मोहन निगळ या युवकास देण्यात आला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST