प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलाय हा जगातील सर्वात मोठा 'चरखा'..!
लखनऊ - प्लास्टिक बंदीचा संदेश देण्यासाठी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक अनोखी पद्धत वापरण्यात आली आहे. प्रशासनाने तिथे प्लास्टिकपासून बनवलेला तब्बल १,६५० किलोचा चरखा उभारण्यात आला आहे. जगातील हा सर्वात मोठा चरखा आहे. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या चरख्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पाहुया 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट..