कोरोनाबद्दल जनजागृती करणाऱ्या महिला 'पोलीस मित्र' - dungarpur police mitra
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाचं पालन करण्यासाठी लोकांना पोलीस जागरूक करत आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांचा वाढता कामाचा ताण पाहता राजस्थानातील डुंगरपूरमध्ये पोलीस मित्र खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. इथं जवळपास 20 पोलीस मित्र आहेत ज्यामध्ये 4 ते 5 मुलींचा समावेश आहे. त्यांनीही या जनसेवेत स्वत:ला झोकून दिलं आहे. कोरोनाच्या या काळात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्हाला सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती.विशेष म्हणजे, कोरोनाच्या संकटात राजस्थानमध्ये प्रथमच महिला पोलीस मित्रही रस्त्यावर उतरले आहेत. डुंगरपूरमधील कडक उन्हात या महिला 6 पोलीस मित्र आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.