VIDEO राज्यसभेतील गोंधळाचा व्हिडिओ, विरोधी पक्षांच्या सदस्यांची मार्शलला धक्काबुकी - General Insurance Business Amendment Bill
नवी दिल्ली - संसदेत काल (11 ऑगस्ट 2021) विरोधी पक्षांच्या खासदारांनी मार्शलला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मार्शलने राज्यसभेच्या महिला खासदारांशी गैरवर्तवणूक केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप केंद्र सरकारने गुरुवारी फेटाळला आहे. राज्यसभेत बुधवारी अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून विरोधी पक्षांचे सदस्य हे टेबलवर चढण्यांच्या घटनांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल. तरीही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनावजवळ येऊन जोरदार घोषणा आणि कागद फेकून दिले. तर काही सदस्यांनी आसनाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये वाद झाला.