देव तारी त्याला... रेल्वे अंगावरून जाऊनही वाचले प्राण - रेल्वेखाली गेली महिला
बिहारच्या मुंगेरमधील जमालपुर रेल्वे स्थानकावर चित्तथरारक घटना घडली. आपल्या मुलाला कडेवर घेऊन चालत्या रेल्वेतून महिला उतरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, ती रेल्वे खाली गेली. यानंतर दोघांवरून संपूर्ण ट्रेन गेली. मात्र, मुलगा आणि महिलेला दुखापतही झाली नाही. स्थानकावरील नागरिकांना 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आला.