नारी कुठेही कमी नाही; जंगल वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या महिलेची कहाणी..! - जंगलाची रखवालदार महिला
बंदीपूर (कर्नाटक) - आपल्याकडील पुरुषप्रधान मानसिकतेमुळं महिलांना नेहमीच कमी लेखलं जातं. चूल आणि मूल इथंपर्यंतच त्यांचा विचार होतो. नोकरी करून स्वत:च्या पायावर उभ्या राहणाऱ्या फार कमी महिला असतात. मात्र, या बहादूर महिलेला पहा, गेल्या १० वर्षांपासून जंगलाचं रक्षण करण्याचे काम त्या करताहेत. २५ वर्षांपासून मी वनविभागासाठी सेवा देत आहे. मी सर्व विभागांमध्ये काम केले आहे. नर्सरीमधील रोपांची देखभाल करून ती नंतर जंगलात लावली आहेत. विभागाकडून केल्या जाणाऱ्या छाप्यांमध्येही मी सहभागी असायची. जंगलामध्ये लागलेली आग विझवण्याचे कामही मी केले आहे, असे वनरक्षक नगम्मा यांनी सांगितले.
Last Updated : Apr 8, 2021, 6:33 AM IST